JNV ENTRANCE नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 अर्ज भरण्यास मुदतवाढ, वडिलाचे नाव येत नसल्यास काय करावे.......



 JNV Entrance Test 2026 Updates - नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 अर्ज भरण्यास मुदतवाढ, अर्जात वडिलाचे नाव येत नसल्यास काय करावे...?

 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी – 2026

शैक्षणिक सत्रासाठी जेएनव्हीमध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी जेएनव्ही निवड चाचणी.

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA Selection Test-2026


महेश लिपटे सर: जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे.





वडिलाचे नाव येत नसल्यास👇🏻

पहिल्या पेज वर शेवटच्या tab वर विद्यार्थ्याचे आधार कार्ड नंबर लिहिण्याची सूचना येते तेव्हा आधार कार्ड नंबर न लिहिता no करावे.

तेव्हा पालकाचे रहिवासी कागदपत्र(आई/वडिलाचे व्होटिंग/आधार/इलेक्ट्रिक बिल) अपलोड करावे.

आता तुम्ही संपूर्ण फॉर्म विना अडचणीने भरू शकता.

विद्यार्थी नाव, पालक नाव,पत्ता.

या परीक्षेसाठी 2025 26 या शैक्षणिक क्षेत्रात पाचव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी करू शकतात.


जवाहर नवोदय विद्यालय वर्ग सहावा प्रवेश परीक्षा 2026 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक.

👇🏻

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/


२०२६-२७ हे वर्ष खाली दिल्याप्रमाणे दोन टप्प्यात आयोजित केले जाईल:

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२५ आहे.

जेएनव्ही निवड चाचणी २०२६ साठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया


जेएनव्ही निवड चाचणीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सोपी करण्यात आली आहे. नोंदणी https://navodaya.gov.in द्वारे लिंक केलेल्या एनव्हीएसच्या प्रवेश पोर्टलद्वारे विनामूल्य करता येते.

उमेदवार आणि पालकांनी अधिसूचना आणि प्रॉस्पेक्टस वाचून पात्रता निकषांची पूर्तता सुनिश्चित करावी लागेल.

खालील कागदपत्रे सॉफ्ट स्वरूपात (१० ते १०० केबी आकाराचे जेपीजी फॉरमॅट)


नोंदणीसाठी तयार ठेवता येईल:

कागदपत्र

👇🏻

1.छायाचित्र

2.पालकांची स्वाक्षरी

3.उमेदवाराची स्वाक्षरी

4.जात प्रवर्गातील अर्ज केल्यास जात प्रमाणपत्र

पात्र उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल आणि उमेदवार व त्याच्या पालकांच्या स्वाक्षरीसह फोटो अपलोड करावा लागेल.

प्रमाणपत्र फक्त १०-१०० केबी आकाराच्या jpg स्वरूपात अपलोड करावे.

एनआयओएसमधील उमेदवारांच्या बाबतीत, उमेदवारांनी 'बी' प्रमाणपत्र घेतले पाहिजे आणि तो/ती ज्या जिल्ह्यात प्रवेश घेऊ इच्छित आहे त्याच जिल्ह्यातील प्रामाणिक रहिवासी असावा.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म ओपन सोर्समध्ये आहे आणि मोफत आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट इत्यादी कोणत्याही स्रोतावरून अर्ज सादर करता येतो.

सर्व जेएनव्हीमध्ये, उमेदवारांना/पालकांना मोफत अर्ज अपलोड करण्यास मदत करण्यासाठी एक मदत कक्ष उपलब्ध असेल. नोंदणी प्रक्रियेसाठी एसएमएसद्वारे ओटीपी, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पालक उमेदवार आणि आवश्यक कागदपत्रे जसे की उमेदवार आणि त्याच्या/तिच्या पालकांच्या स्वाक्षरीसह फोटो आणि वैध सक्रिय मोबाइल नंबर असलेला मोबाइल फोनसह जेएनव्हीमधील मदत कक्षशी संपर्क साधू शकतात.

निवडीनंतर प्रवेशाच्या वेळी सहाय्यक कागदपत्रांसह सिद्ध होऊ शकेल अशी योग्य माहिती पोर्टलमध्ये प्रदान करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. उमेदवारांना विशिष्ट "जेएनव्ही" साठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ज्यासाठी तो/ती पात्र आहे, निवासस्थान आणि अभ्यासाच्या तपशीलांबाबत खोटी माहिती सादर केल्यास उमेदवारी रद्द होईल.

ऑनलाइन डेटा कॅप्चर केला जात असल्याने, ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये डेटा काळजीपूर्वक भरण्याची विनंती केली जाते.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 साठी अर्ज करण्यासाठी दिनांक 29 July 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहूया टप्प्या टप्प्याने  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज कसा भरावा..!!


जर आपण स्वतः फॉर्म भरला तर आपला वेळही वाचेल आणि पैसेही.

फॉर्म भरणे अगदी सोपे आहे.

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील google application open करून त्यात Navoday Addmission सर्च करा.

त्याचा फोटो काढून त्यावरील विद्यार्थ्यांचा फोटो विद्यार्थ्यांची सही पालकाची सही व संपूर्ण प्रमाणपत्राचा फोटो व्यवस्थित क्रॉप करून ठेवावा.

( त्याची साईज ऍडजेस्ट करण्यासाठी त्या इमेज एका व्हाट्सअप वरून दुसऱ्या व्हाट्सअप वर पाठवल्यानंतर कमी करता येते) 

तुम्हाला सर्च मध्ये सुरवातीलाच जे suggestion दिसते त्यामधे 2025-26 च्या खाली दिलेल्या register या वर क्लिक करा

किंवा खालील लिंक वर क्लिक करा

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

त्यावर क्लीक केल्यावर तुम्हाला

👆अशी विंडो ओपन होईल त्यामधील chick here to class VI Registration वर क्लिक करा  पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

वरील विंडो मध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थी पाचवा वर्ग पास झालेला आहे का त्या खालील ऑप्शन मध्ये No निवडा.

विद्यार्थ्यांनी या अगोदर प्रवेश परीक्षा दिली आहे का त्या खालील ऑप्शन मध्ये देखील No निवडा.

आपण संपूर्ण माहिती पत्रक वाचले आहे का त्याखालील ऑप्शन मध्ये Yes निवडा.

तुम्ही ज्या जिल्ह्यातून प्रवेश परीक्षा देत आहात त्या जिल्ह्यातील रहिवासी आहात का त्याखालील ऑप्शन मधून Yes निवडा.

तुमच्याकडे आधार नंबर आहे काय त्याखालील ऑप्शन मधून Yes निवडा व त्याखाली दिलेल्या बॉक्समध्ये आपला बारा अंकी आधार क्रमांक नोंदवा. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.(वडिलाचे नाव,पत्ता चुकीचा येत असेल तर आधार नंबर टाकू नये.)

सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला सहा अंकी ओटीपी तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबर वर जर प्राप्त झाला असेल तर खालील विंडो मधील दुसऱ्या रकान्यात सहा अंकी ओटीपी नोंदवा व सबमिट बटन वर क्लिक करा.

जर ओटीपी प्राप्त झाला नसेल तर आपल्याला ओटीपी प्राप्त झाला आहे काय या खालील ऑप्शन मध्ये No निवडा व त्याखालील हिरव्या रंगाच्या सबमिट बटन वर क्लिक करा.

पुढील प्रमाणे.

वरील विंडो मधील सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालका चा रहिवासी दाखला फोटो काढून तो पुढील विंडोमध्ये निवडून सबमिट बटन वर क्लिक करा .

वरील विंडोमध्ये रहिवासी दाखला अपलोड केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये

आता खाली स्क्रोल करून state Maharashtra निवडा, तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, तुमच्या शाळेचे नाव लिहा विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, आईचे व वडिलांचे नाव, भरा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी विद्यार्थ्याचा उपलब्ध असेल तर भरा आई वडील नसतील तर पालकाचे नाव व विद्यार्थ्यांशी असलेलं नातं लिहा.

त्यानंतर विद्यार्थ्यांचं Identification Mark म्हणजेच ओळखीचं चिन्ह लिहा. पत्रव्यवहाराचा पत्ता लिहा पिन कोड लिहणे बंधनकारक आहे. या आगोदर ३री ४थी शिकलेल्या शाळेची महिती भरा व आता ५व्या वर्गात शिकत असलेल्या शाळेची संपूर्ण माहिती भरा.

त्यानंतर याआगोदर क्रॉप करून ठेवलेले फोटो, विदयार्थी व पालक सह्या आणि संपूर्ण certificate योग्य ठिकाणी upload करा.

आणि submit & preview वर क्लिक करा. ओपन झालेल्या विंडोमध्ये सगळी माहिती एकदा पुन्हा चेक करा बरोबर असल्यास final submission वर क्लिक करून अर्ज submit करा तुमचे registration पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा registration number दिसतो तो नोंदवून घ्या त्याचे खाली प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करून त्याला print वर क्लिक करा प्रिंटर वरून प्रिंट काढा प्रिंटर ऊपलब्ध नसल्यास त्याला save as PDF करून मोबाईल मध्ये pdf स्वरूपात फॉर्म विद्यार्थ्याच्या नावाने save करा म्हणजे तो सापडण्यास सोपा जाईल. तो शोधून तुम्ही त्याची केंव्हाही प्रिंट काढू शकता. अथवा ती pdf विद्यार्थ्याच्या पालकाच्या मोबाईल वर व्हॉट्स ॲप वर पाठवू शकता.

ही माहिती वर्ग 5 वी बालक पालक यांच्या पर्यंत पोहचवा..

Thank you 🙏🏻

No comments:

Post a Comment

WCL update: राजूर भूमिगत खाण पुन्हा सुरू, खाजगी कंपनी उत्खनन करणार.

  WCL: राजूर अंडरग्राऊंड माईन्स पुन्हा सुरू, खाजगी कंपनी उत्खनन करणार. WCL आणि त्रिवेणी राजूर कोल माईन्स प्रा.लि. यांच्यात करार झाला.  वणी, ...